Kolhapur Minor Drivers : सुसाट वेग, अल्पवयीन हातात स्टेअरिंग! १३ महिन्यांत ५५३ कारवाया; तरीही अपघातांचा वेग कमी कधी होणार?

Police Action : १५४ पालकांविरोधात न्यायालयीन खटले दाखल झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २७ लाखांचा दंड वसूल करूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसल्याने केवळ पोलिस कारवाई पुरेशी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Traffic police

Traffic police

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘सुसाट’ वेगाने चाललेल्या वाहनांचे चालक पाहूनच अनेकांच्या भुवया उंचावतात. शाळा, महाविद्यालयांबाहेर ट्रिपलसीट धावणाऱ्या वाहनांचे बहुतांश चालक ‘अल्पवयीन’ असल्याचे कारवायातून दिसून येते. मागील तेरा महिन्यांत ५५३ परवाना नसलेल्यांवर पोलिसांनी कारवाई केली, तर १५४ पालकांविरोधात न्यायालयात खटले पाठविण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com