
राहुल शेळके
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (MSME) पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरात आज, शनिवारी (२८ जून) 'एमएसएमई कॉन्क्लेव्ह'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. 'सकाळ माध्यम समूह' आणि 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया, कोल्हापूर (ICAI)' यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता.