

MSME Land Issues
sakal
कोल्हापूर: सूक्ष्म-लघु-मध्यम (एमएसएमई) उद्योग हे औद्योगिक क्षेत्राच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यांच्यामुळे अर्थचक्राला गती मिळते. या उद्योगांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणे सद्य:स्थितीत फार महत्त्वाचे आहे. त्यात प्रामुख्याने कर्जासाठीचे तारण आणि इंडस्ट्रियल ‘एनए‘ची अट रद्द करून जागेचा प्रश्न सुटावा, या उद्योगांना पूर्वीप्रमाणे भांडवली अनुदान देणाऱ्या वेगळ्या योजना केंद्र आणि राज्य सरकारने राबवाव्यात, अशा विविध मागण्या, अपेक्षा आज कोल्हापुरातील उद्योजकांनी ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केल्या.