esakal | कोल्हापूर : भाऊ, लक्ष असू दे!
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : भाऊ, लक्ष असू दे!

कोल्हापूर : भाऊ, लक्ष असू दे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीस अवधी असला तरी इच्छुकांनी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आज शक्तिप्रदर्शन केले. काही ठिकाणी उमेदवार समोरासमोर उभे राहून भाविकांसोबत मोरय्याचा गजर करत होते. मार्चमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २१ डिसेंबरला आरक्षण सोडत झाली आहे. नंतर इच्छुकांनी प्रभागात प्रचारफेऱ्याही सुरू केल्या.

घरगुती मूर्ती विसर्जनाचा आजचा दिवस इच्छुकांसाठी सुवर्णसंधी होती. सायंकाळी सहानंतर गर्दी वाढू लागताच ही मंडळी बाहेर पडली. पर्यावरणपूरक मूर्ती दान केल्यानंतर ती व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी या मंडळींनी घेतली. काहींनी भाविकांच्या स्वागताचे डिजिटल फलक उभे केले. काहींनी मंडप टाकूनच ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून भाविकांचे स्वागत केले.

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

एकाला हात जोडावा, तर दुसरा नाराज नको यासाठी लोकही दोघांनाही प्रतिसाद देत होते. निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवायची हे नंतर ठरवू; पण मतदारांशी संपर्क साधण्याची संधी सोडायची नाही, याच हेतूने इच्छुक आज उतरले होते. काहींनी ट्रॅक्टर ट्रॉलीची मूर्ती वाहून नेण्याची व्यवस्था केली.

जय्यत तयारी

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल, याची झलकच भावी उमेदवारांनी दाखवली.

loading image
go to top