

illegal water connections
sakal
कोल्हापूर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकीत व अनधिकृत अशी दहा कनेक्शन तोडली. त्यातून २१ लाख ८९ हजारांची थकीत रक्कम वसूल केली. वितरण शाखा व पाणीपट्टी शाखा यांच्या संयुक्त पथकाकडून शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कारवाई सुरू आहे.