Kolhapur Flashback : झटपट निर्णय, निर्भीड अंमलबजावणी; कोल्हापूर महापालिकेतील प्रशासक राजाची राज्यभर चर्चा
Municipal Administration : खुले दरवाजे आणि शिस्तप्रिय कारभारामुळे सामान्य नागरिक निर्भय झाला. नगरविकास योजनेतील रखडलेले प्रकल्प मार्गी लावत शहररचनेत बदल, राजकीय दबाव झुगारून नियमबाह्य कामांना नकार देणारा प्रशासकीय ठसा
कोल्हापूर : शहरातील वाढती लोकसंख्या व नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नाच्या मर्यादा व वाढते खर्चाचे प्रमाण व्यस्त होते. त्याच्या ताळमेळ घालणे प्रशासक व्दारकानाथ कपूर यांना मोठे आव्हान होते.