

Chairperson Elections
sakal
कोल्हापूर : महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे विशाल शिराळे यांची आज बहुमताने निवड झाली, तर परिवहन समिती सभापतिपदी शिवसेनेचे सत्यजित जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी शिवसेनेच्याच कौसर बागवान, तर उपसभापतिपदी भाजपच्या दीपा ठाणेकर यांचीही बहुमताने निवड झाली. परिवहन निवडीनंतर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात मिरवणूक काढल्या.