कोल्हापूर : शहरातील सुविधा व उणीवांबाबतची माहिती घेऊन त्याप्रमाणे विकास आराखडा बनवण्यासाठी महापालिकेने तिसऱ्या सुधारित विकास योजनेसाठी जनमत सर्व्हेक्षण सुरू केले आहे. थेट प्रभागात जाऊन नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत आहे.