कोल्हापुरात नेत्यांना लागलेत महापालिका निवडणुकीचे वेध ; विकासकामांना जोर

kolhapur municipal corporation election start form next year but leaders communicate with citizens in kolhapur city
kolhapur municipal corporation election start form next year but leaders communicate with citizens in kolhapur city
Updated on

कोल्हापूर : पालिका सभागृहाची मुदत संपताना तसेच नव्या वर्षात निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राजकीय नेत्यांनी शहरात साखरपेरणी सुरू केली आहे. नागरिकांशी संवाद साधून पक्षाची भूमिका सांगण्याचा प्रयत्न होत आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल शिवाजी पेठेतील नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवक अजित राऊत यांच्या निमंत्रणावरून दिवाळी शुभेच्छा देणासाठी मुश्रीफ आले होते. ॲड. अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव, माजी महापौर बाजीराव चव्हाण, परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सभागृहाची मुदत उद्या मुदत संपत आहे. पंधरा दिवसांपासून नगरसेवकांनी उर्वरित विकासकामांचा धडाका लावला. निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर कामे व्हायला हवीत, या उद्देशाने कामाला लागले होते. विधानसभेचा अपवाद वगळता शिवसेनेला साथ मिळत गेली. पालिका निवडणुकीत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला नेहमी साथ मिळाली आहे. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचे ठरावीक प्रभागांवर कमांड आहे. गेल्या वेळी काँग्रेसच्या मिळून ४४ जागा निवडून आल्या. भाजप-ताराराणी आघाडीने मुसंडी मारत ३३ जागा पटकाविल्या. 

कोरोनाची खिंड

नव्या वर्षातील निवडणूकही महाविकास आघाडीविरुद्ध भाजप-ताराराणी अशीच होणार आहे. सात महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कोरोनाच्या उपाययोजनात व्यस्त होते. दिवाळीनंतर हे सगळेजण निवडणुकीच्या तयारीला लागतील.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com