Kolhapur : इराणी खणीवर १३ तराफे, चार क्रेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur ganeshotsav

Kolhapur : इराणी खणीवर १३ तराफे, चार क्रेन

कोल्हापूर : इराणी खण येथे गणेश विसर्जनासाठी १३ तराफे, ४ क्रेन तसेच ४३० हमालांची व्यवस्था केली आहे. १२ सीसीटीव्ही आहेत. स्वयंचलित यंत्रणाही छोट्या मूर्तींसाठी वापरली जाणार आहे. या सुविधांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. विसर्जनासाठी शहरात महापालिकेचे १५०० कर्मचारी तैनात असून विविध ठिकाणी २५ कृत्रिम विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे.

इराणी खाणीच्या ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती विसर्जित केल्या जाणार आहेत. मिरवणुकीतील तसेच अन्य मार्गांनी मंडळे तिथे दुपारनंतर येणार असल्याने दोन खाणीमध्ये मंडळांची वाहने जाण्याची तसेच बाहेर पडण्याची व्यवस्था केली आहे. रात्रभर उपायुक्त रविकांत आडसूळ उपस्थित राहणार आहेत. चारही विभागीय कार्यालयांमार्फत त्यांच्या परिसरात २५ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. पंचगंगा घाट परिसर बॅरिकेडस लावून बंद केला आहे. राजाराम बंधाऱ्यावरील घाटापर्यंत मूर्ती नेता येणार आहे. तिथून वाहनातून इराणी खाणीवर मूर्ती विसर्जनासाठी नेल्या जाणार आहेत. मंडळांच्या स्वागतासाठी महापालिकेचे पापाची तिकटी व निर्माण चौक येथे स्वागत कक्ष आहे.

मार्गावरील धोकादायक इमारतींना नोटीस दिल्या असून त्यातील नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी धोकादायक इमारतीमध्ये राहू नये. इमारतीखाली उभे राहून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन केले आहे. पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अन्य अधिकारी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकीसाठी पार्किंगस्थळे पुढीलप्रमाणे

ठिकाण वाहन

दसरा चौक दुचाकी, चारचाकी

तोरस्कर चौक शाळा दुचाकी

  • छत्रपती शिवाजी स्टेडियम दुचाकी

  • १०० फुटीरोड चारचाकी

  • शाहू दयानंद हायस्कूल चारचाकी

  • पेटाळा मैदान चारचाकी

  • निर्माण चौक चारचाकी

  • सिद्धार्थनगर कमान दुचाकी

  • दुधाळी दुचाकी, चारचाकी

  • ताराराणी विद्यालय दुचाकी

  • गांधी मैदान चारचाकी

Web Title: Kolhapur Municipal Corporation Ganeshotsav 2022 Ganesh Festival Crane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..