Kolhapur News : 'महापालिकेतर्फे सेंट्रल वॉर रूम सुरू'; पंचगंगा पाणी पातळीत वाढ, चार विभागीय कार्यालयात मदत कक्षही
Kolhapur: महापालिकेने यापूर्वी अगिनशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयामध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांच्या सुविधांसाठी मदत कक्ष सुरू केले आहेत. विभागीय कार्यालयातील नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
Kolhapur Municipal Corporation activates War Room and help desks as Panchganga water level surges.Sakal
कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढ होत असल्याने महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात आजपासून सेंट्रल वॉर रूम सुरू केली आहे. वॉर रूममधील दोन फोन नंबर्सवर नागरिकांना तक्रारी नोंदवता येणार आहेत.