

Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
esakal
कोल्हापूर: पाणीपुरवठा, नगररचना, आरोग्य विभाग, शहर अभियंता अशा महत्त्वाच्या विभागांबरोबरच इतर विभागांत आवश्यक कर्मचारी बाह्य संस्थांकडून (आउटसोर्सिंग एजन्सी) नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. यातून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. विविध विभागांत कर्मचारी मिळत नसल्याच्या तसेच कामे होत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी हा पर्याय स्वीकारण्यात आला.