Election Code of Conduct : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच शहरातील बेकायदेशीर फलकांवर कारवाई सुरू करण्यात आली. चार विभागीय कार्यालये व अतिक्रमण निर्मूलन पथकांच्या माध्यमातून १८९ फलक जप्त करण्यात आले.
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने आज शहरातील विविध भागातील १८९ फलक अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केले. आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून उद्घाटनाचे विविध फलक व वार्ताफलकही बंद करण्यात येत आहेत.