Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख- आदिल फरास यांच्यात जोरदार वाद; पालिकेच्या दारात कार्यकर्ते एकवटले

Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेच्या बैठकीत शारंगधर देशमुख आणि आदिल फरास यांच्यात जोरदार वाद झाला. या वादानंतर महापालिकेच्या दारात दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकवटले.
Kolhapur Municipal Corporation Meeting dispute

Kolhapur Municipal Corporation Meeting dispute

esakal

Updated on

Kolhapur Municipal Corporation Meeting : महापालिकेतील सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यातील वाद आज पुन्हा उफाळला. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीत आयुक्तांसमोर दोघांनी एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करत शड्डू मारत चौकात ये, बघून घेण्याची भाषा तर केलीच. अंगावर चाल करण्यासाठी शर्टाच्या बाह्याही सरसावताना पदाधिकाऱ्यांनी थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर दोन्ही समर्थकांनी महापालिकेत तसेच प्रवेशद्वारावर गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com