
Kolhapur Politics : भविष्यात महापालिकेचा विस्तार होणार आहे. त्यादृष्टीने अत्याधुनिक सोयीसुविधा असणारी इमारत बनवली पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची इमारत पाहा. चांगला आराखडा बनवा. त्यासाठी स्पर्धा घ्या. सर्वोत्तम आराखड्याची निवड करा. त्यासाठी तीन एकर जागा पुरेशी नाही, पाच एकर जागेचा प्रस्ताव बनवा.’’ अशी थेट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनाला दिली. महापालिकेच्या प्रस्तावित इमारतीचा आराखडा सादर करण्यात आला. तसेच तीन एकर जागेची मागणीही केली गेली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आराखड्यावर नापसंती व्यक्त केली.