कोल्हापूर: नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पाहता महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमासाठीही कमी कालावधी मिळण्याच्या शक्यतेने इच्छुकांनी आतापासूनच धावण्यास सुरुवात केली आहे. .प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीबरोबरच घराघरांत पत्रके पोहोचविण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या प्रभाग आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांच्या प्रचाराला वेग येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. .पण, निवडणूक होणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून त्यावर पडदा टाकण्याचे काम केले आहे. यामुळे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली वेगावल्या आहेत. चार सदस्यीय प्रभाग रचना झाल्याने आजूबाजूचे प्रभाग समाविष्ट झाले आहेत. .त्यांची भौगोलिक रचना वाढली आहे. अनेक नवीन कॉलन्या आल्या असल्याने पूर्वी एका प्रभागात काम करणाऱ्यांसाठी नवीनच आहे. अशा प्रभागात पोहोचण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागणार आहे. .त्यामुळे इच्छुकांनी प्रभागरचना अंतिम होताच नवीन भागात फिरण्यास सुरुवात केली होती. आरक्षण सोडत व मतदार यादीचा कार्यक्रम एकदमच सुरू होणार असून, त्यात महिन्याभराचा कालावधी जाणार आहे..त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जास्तीत जास्त ३० दिवसांपर्यंतचा असण्याची शक्यता आहे. नवीन प्रभागात प्रचार करण्यासाठी हा फारच कमी वेळ असल्याने इच्छुकांनी आतापासूनच प्रभागातील भेटीगाठी वाढवल्या आहेत. नवीन समाविष्ट झालेल्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटींसाठी नियोजन करून इच्छुक बाहेर पडत आहेत. .सकाळपासून त्या भागात प्रत्येकाला भेटत, विचारपूस करत असल्याचे इच्छुक दिसत आहेत. प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या परिसरातील कॉलनींतील मतदारांची एकत्र भेटीची वेळ ठरविली जात आहे. काही ठिकाणी कॉलनीतील बैठकांमध्ये अचानक जाऊन उपस्थिती लावली जात आहे..महापौरपदाचे टार्गेटप्रत्येक प्रभागात ओबीसींची जागा निश्चित आहे. तसेच एससी प्रवर्गाच्या जागा असलेले प्रभाग निश्चित आहेत. त्यामुळे या दोन गटांतील इच्छुकांनी आपण नाहीतर पत्नी, नातेवाईक निश्चित करून ठेवले आहेत. पक्षांना कशा जागा मिळतात?, त्यावर ते पक्ष निश्चित करणार आहेत. खुला व खुल्या प्रवर्गातील महिला या जागेसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे..महापौरपद आरक्षित राहणार की खुले राहणार, याचे आरक्षण लवकरच जाहीर होणार आहे. त्यानंतर महापौरपदाचे टार्गेट ठेवूनही अनेक जणांनी रिंगणात उतरण्याचे नियोजन केले आहे. पुढील आठवड्यानंतर या घडामोडींना वेग येणार असून, तोपर्यंत हक्काच्या मतदारांना भेटून मतदान पक्के करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.