Kolhapur Municipal Corporation Elections
esakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी (Kolhapur Municipal Corporation Elections) काँग्रेसने काल पहिल्या टप्प्यातील ८१ पैकी ४८ उमेदवारांची ‘जंबो’ यादी जाहीर केली. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी जाहीर केलेल्या या यादीत १५ माजी नगरसवेक, तर ३३ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या यादीत माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते व प्रकाश पाटील, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांनाही उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने अनुभवी व नव्या चेहऱ्यांचा समतोल साधला आहे.