

Newly elected corporators celebrate after Kolhapur municipal election results.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत माजी महापौर माधवी गवंडी, स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, संजय मोहिते यांच्यासह १७ माजी नगरसेवक विजयी झाले. तसेच सभागृहात ५८ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, तर माजी उपमहापौर प्रकाश पाटील, भूपाल शेटे, विलास वास्कर यांच्यासह २२ माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला.