

Elected representatives from political families celebrate victory in Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या निकालाने उधळलेल्या गुलालात घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झाला. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र सत्यजित, माजी महापौर सुनील कदम यांचे पुत्र स्वरूप, माजी महापौर दीपक जाधव यांच्या स्नुषा सृष्टी, माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्किन यांच्यासह माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा घराणेशाही झिंदाबाद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.