

Candidates lead massive padayatras as Kolhapur civic election campaign peaks.
sakal
कोल्हापूर : जाहीर प्रचाराला एकच दिवस राहिल्याने आजही अनेक उमेदवारांनी भागाभागांमध्ये मोठमोठ्या पदयात्रा काढत शक्तिप्रदर्शन केले. विरोधकांना शह देण्यासाठी अनेकांनी साथ मिळविण्याचे शेवटचे अस्त्र काढले. त्यामुळे एक गल्ली एका उमेदवारासोबत, तर शेजारची गल्ली दुसऱ्याच उमेदवारासोबत असल्याचे चित्र आहे. एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी शह-काटशहचे राजकारण शहरभर चांगलेच तापू लागले आहे.