Kolhapur Election : नगरपरिषद निकालाच्या दिवशी ६०० पोलिस रस्त्यावर; गुलाल, फटाके आणि मिरवणुकांना पूर्ण बंदी
Tight Police Security : नगरपरिषद व नगरपंचायत निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त, निकालानंतर विजय मिरवणुका, फटाके फोडणे व गुलाल उधळण्यास पोलिस प्रशासनाची स्पष्ट मनाई; विनापरवाना मिरवणूक काढल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपरिषदा व तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१) जाहीर होणार आहे. मतमोजणीसह जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.