

Election officials and staff manage polling booths and EVM transportation during Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी राबवलेल्या मतदान प्रक्रियेसाठी तीन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची यंत्रणा रात्री उशिरापर्यंत राबली. ५९५ मतदान केंद्रांबरोबरच मतदान यंत्रांची वाहतूक करण्यासाठी केएमटी, एसटीचे कर्मचारी, दिव्यांगांना मदत करण्यासाठी आशा वर्कर्स, आरोग्य विभागाचे, तर आरोग्यविषयक मदत करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारीही तैनात होते. तसेच मतदारांचे नाव शोधण्यासाठी बीएलओही मतदान केंद्राच्या आवारात होते.