Kolhapur Election : महायुती विरुद्ध महायुती सामना; कोल्हापूरच्या प्रभाग ९ मध्ये माजी नगरसेवकांची प्रतिष्ठेची लढत
Ex Corporators Face Off in ward 9 : देशमुख–माने आमनेसामने; माजी नगरसेवकांत प्रतिष्ठेची राजकीय चाचपणी, महायुतीतील अंतर्गत संघर्ष; प्रभाग ९ मध्ये समीकरणे दररोज बदलती. रंकाळा तलाव ते अतिक्रमण प्रश्न; विकास मुद्द्यांवरच मतदारांचा कौल
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊमध्ये उमेदवारी निश्चित समजून इच्छुकांनी जोरदार प्रचारास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून काही प्रस्थापितांची उमेदवारी निश्चित झाली आहे.