Kolhapur Municipal : गुन्हेगारीचा थेट प्रवेश; महापालिका निवडणुकीत गुंड-मटकेवाल्यांची बायकांसाठी उमेदवारीची धडपड
Criminal Backgrounds Surface : गंभीर गुन्हे दाखल असतानाही पत्नींच्या नावावर निवडणूक लढवण्याची शक्कल, पैशाची ताकद आणि निवडून येण्याची क्षमता; पक्षांचा प्रमुख निकष ठरणार? गुंडगिरी, मटका आणि पांढरपेशा सावकारी; महापालिका निवडणुकीत सगळेच सक्रिय
कोल्हापूर : शहर व परिसरात मटक्याची बुकी चालवणारे, खंडणी, खुनाचा प्रयत्न, मारामारी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत थेट मोकाची कारवाई झालेले गुंडही महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.