
Kolhapur : महापालिका निवडणुकीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने अकरा दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल केला आहे. त्यामध्ये गुगल मॅपवर तयार केलेल्या प्रभागाच्या हद्दी तपासण्यासाठी जवळपास एक महिना दिला असून, यामुळे अंतिम प्रभाग रचना आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल. परिणामी, पुढील प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने नवीन वर्षात निवडणूक होईल.