Pune-Bengaluru Highway Accident
esakal
नागाव (कोल्हापूर) : भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने बुवाचे वाठार येथील महिला जागीच ठार (Nagav Road Crash) झाली. सोनाली शुभम कांबळे (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर मोहसीन पिंजारी याच्या डोक्याला व पायास गंभीर मार लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सोनालीचा दीड वर्षाचा मुलगा सार्थक हा थोडक्यात बचावला.