कोल्हापूर : शहर परिसरात पारंपरिक उत्साहात नागपंचमी साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpanchami

कोल्हापूर : शहर परिसरात पारंपरिक उत्साहात नागपंचमी साजरी

कोल्हापूर : नागपंचमीनिमित्त शहरातील नागोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली. श्रावणातील पहिला सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपंचमीनिमित्त धार्मिक विधी झाले. सर्पमित्र संस्थांतर्फे नागरिकांना सर्पांविषयी माहिती दिली. धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून शहरात नागपंचमी साजरी केली. नागपंचमीनिमित्त घरोघरी नागाच्या मूर्तीची पूजा केली. दूध, लाह्या, ओल्या नारळाच्या करंजा यांचा नैवेद्य दाखवला.

शुक्रवार पेठेतील कद्रे आणि नागराज गल्लीतील नागोबा मंदिराचे लोकवर्गणीतून सुशोभीकरण केले आहे. मंदिर भाविकांना आजपासून दर्शनासाठी खुले झाले. यानिमित्ताने महाप्रसादाचे वाटपही झाले.

पंचेचाळीस वर्षांपूर्वी कद्रे गल्लीतील घराजवळ नागोबाची दगडी मूर्ती होती. त्यानंतर नागरिकांनी छोटे मंदिर उभारले. नागराज गल्लीत नाभिक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने असल्याने त्यांची नागोबावर श्रद्धा आहे. त्यानंतर आजअखेर तीन ते चार वेळा मंदिराचे सुशोभीकरण आले आहे. पण मंदिरावर शिखर नसल्याने यावर्षी परिसरातील नागरिकांनी शिखरासह मंदिराचे सुशोभीकरण केले आहे. लोकवर्गणीतून देखणे मंदिर साकारलेआहे. मंडळाचे मदन माने, अमर माने, श्रीकांत भोसले, उदय माने, संजय माने, राजेश रणवरे, उत्तम माने, अमृत माने, विनायक माने, गणेश पोवार यांनी सुशोभीकरण उपक्रमाचे नियोजन केले.

Web Title: Kolhapur Nagpanchami Celebrated Traditional Enthusiasm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..