कोल्हापूर : राज्याची उपराजधानी नागपूरशी आता कोल्हापूर हवाई सेवेद्वारे जोडले जाणार आहे. येत्या १५ मेपासून नागपूर-कोल्हापूर सेवेला प्रारंभ होणार असून, यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. आठवड्यातील पाच दिवस ही सेवा सुरू राहणार असून, स्टार एअरवेजच्या विमानात १२ बिझनेस क्लास आणि ६४ इकॉनॉमी क्लास आसन व्यवस्था असेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकाद्वारे दिली आहे.