Nandwal temple nirmalya recycling project
esakal
कोल्हापूर : नंदवाळची प्रतिपंढरपूर अशी ख्याती जिल्ह्यात पसरली आहे. प्रतिवर्षी येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांवर पोहोचली आहे. विठ्ठलाला प्रिय असलेली तुळस, चंदन, जास्वंद फुले भाविकांकडून वाहिली जातात. याचे निर्माल्य न होऊ देता, त्याचा गृहोपयोगी वस्तू बनविण्यासाठी यंदा गावातील ‘रणरागिणी’ पुढे आल्या (Women SHG eco friendly temple waste management) आहेत.