कोल्हापूर : नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन, ग्रामस्थांत भीती

सोशल मीडियावर मात्र वाघ आल्याची अफवा
कोल्हापूर : नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन, ग्रामस्थांत भीती
Updated on

हळदी - नंदवाळ (ता. करवीर) येथील नंदवाळ-कांडगाव या दोन गावांच्या हद्दीवर डोंगर परिसरातील नागटेक या ठिकाणी बिबटयासदृश्य प्राणी दिसल्याची माहिती समोर आली आहे. येथील शेतकरी बाजीराव शिंदे हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेताकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोयाबीन पिक असलेल्या शेताच्या बांधावर सदर प्राणी बसलेला त्यांना दिसला. त्यांनी तात्काळ ही माहिती गावातील नागरिकांना तसेच ग्रामप्रशासनाला दिली.

ग्रामप्रशासनाने नंदवाळसह शेजारील कांडगाव, जैताळ, देवाळे गावातील शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. याबाबत वनविभागाला कळविले असून वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती नंदवाळचे ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील यांनी दैनिक 'सकाळ'ला दिली.

कोल्हापूर : नंदवाळ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याचे दर्शन, ग्रामस्थांत भीती
Tea : तुम्हालाही जेवल्यानंतर चहा प्यायची सवय आहे का?, मग वेळीच सावध व्हा..

दरम्यान नंदवाळ गावात वाघ आल्याची अफवा सोशल मीडियावरुन पसरल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तरी सदर प्राणी नेमका कोणता आहे हे खात्रीलायक समजल्याशिवाय लोकांनी अशी माहिती प्रसारित करु नये असे आवाहन नंदवाळ ग्रामप्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com