Kolhapur newly married woman case
esakal
कोल्हापूर : वर्षापूर्वी लग्न झालेल्या आणि एक महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Rajarampuri woman death investigation) केली. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (माहेरचे नाव अस्मिता अनिल सरदेसाई) (वय २३, काटकर पार्क, सायबर चौक, राजारामपुरी, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना काल दुपारी चारच्या सुमारास घडली. याची नोंद रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.