Kolhapur News: गर्भपाताचं रॅकेट! कमिशनसाठी होमगार्ड महिला, गवंडी बनले एजंट; रिक्षातून ४-५ गर्भवतींना पाठवायचे

Illegal Abortion Network Under Investigation in Kolhapur: प्रकरणात पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून, या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींची भूमिकाही तपासली जात आहे.
Kolhapur News

Kolhapur News

esakaol

Updated on

कोल्हापूर: काही काळासाठी होमगार्ड म्हणून काम केलेली रेखा वरुटे (रा. कळंबा), गवंडी काम करणारा सागर तराळ (रा. कर्नाटक) हे डॉ. गायकवाड याच्याकडे गर्भपातासाठी महिला पाठविणारे एजंट बनले. एकाच रिक्षातून चार-पाच गर्भवतींना एकाचवेळी पाठवून देणारी वरुटे कमिशन मिळविण्यात अव्वल होती. तिने काही काळ होमगार्ड म्हणून, तर काही काळ ‘आया’ म्हणूनही कामे केली आहेत. कमिशनची चटक लागल्याने गवंडी कामे करणारा सागर तराळही हे रॅकेट चालविण्यात अग्रेसर होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com