

सार्थकला शेजाऱ्यांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
esakal
Kolhapur Tragedy : उचगाव येथील मंगेश्वर मंदिर मागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत तारेवर अडकलेला पतंग काढताना विजेचा धक्का लागून सार्थक नीलेश वळकुंजे (वय १६, धनगर गल्ली उचगाव) या शाळकरी मुलाचा बुधवारी मृत्यू झाला. त्याचा भाऊ कार्तिक नीलेश वळकुंजे ( वय १४, धनगर गल्ली) हा गंभीर जखमी झाला. ही घटना सायंकाळी सहाला घडली.