कोल्हापूर : जिल्ह्यातील १० विधानसभा जागांसाठी नुकतेच मतदान आणि मतमोजणी झाली. त्यानंतर काही उमेदवारांनी ईव्हीएम यंत्रावर आक्षेप घेऊन त्याच्या फेरचाचणीची मागणी केली. निवडणूक आयोगाने याबाबतची सुविधा दिलेली आहे. .Sangli News : पालिका, जिल्हा परिषदेसाठी आबा गटात ‘फील गुड’; कार्यकर्ते लागले कामाला.त्यानुसार जिल्ह्यातील हातकणंगले, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि चंदगड मतदारसंघांतील काही उमेदवारांनी याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार या पाच मतदारसंघांतील मतदानयंत्रांची फेरचाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी विहित शुल्कही भरलेले आहे. आठ जानेवारीनंतर ही प्रक्रिया पार पडणार आहे.विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडून आले. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला. ईव्हीएम यंत्रामध्ये पारदर्शक मतदान होत नाही, अशी त्यांची भूमिका होती. .निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिलेल्या अधिकारात त्यांनी मतदान यंत्रांची पुन्हा चाचणी करण्याबाबत अर्ज केला. ऋतुराज पाटील, राजेश लाटकर, राहुल पाटील, राजू आवळे यांनी याबाबत अर्ज दिले आहेत. रविवारी (ता. २९) अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. .त्यानुसार आता जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील ४४ मतदान केंद्रांतील ईव्हीएमची चाचणी होणार आहे. यासाठी प्रत्येक ईव्हीएम यंत्रासाठी ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणी झाल्यानंतर ४५ दिवसांनी अशा प्रकारची चाचणी घेता येते. त्यानुसार आठ जानेवारीनंतर ही चाचणी घेता येणार आहे..Kolhapur Crime : हॉटेल व्यावसायिकाला अपहरण करून लुटले; पाच अटकेत.अशी आहे प्रक्रिया...मतदारसंघातील एकूण मतदानकेंद्रांपैकी पाच टक्के मतदान केंद्रांची निवड उमेदवारांनी करायची. त्या मतदान केंद्रांवरील प्रत्यक्ष मतदान झालेले ईव्हीएम चाचणीसाठी निवडण्यात येणार. त्यानंतर ईव्हीएम बनविणाऱ्या कंपनीचे अभियंता उमेदवारांच्या समोर या ईव्हीएममध्ये मतमोजणीनंतर काही छेडछाड झाली आहे का? याची तपासणी करणार. त्यानंतर उमेदवारांना एका ईव्हीएम मशीनवर जास्तीत जास्त १४०० मते देता येणार आहेत. यावेळी या ईव्हीएम यंत्रावर अन्य नावे आणि चिन्हे असतील. त्यानंतर उमेदवारांच्या सर्व शंकांचे निरसन यावेळी अभियंते करणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.