कोल्हापूर परदेशी खेळाडूंना ‘नो एंट्री’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Football

कोल्हापूर : परदेशी खेळाडूंना ‘नो एंट्री’

कोल्हापूर : दिल्ली, बंगळूर, पश्चिम बंगालमधील साखळी फुटबॉल स्पर्धा आटोपली असून, गोव्यातील साखळी फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. तिथल्या स्पर्धांत परदेशी खेळाडू खेळले असून, कोल्हापूरच्या फुटबॉल(Kolhapur Football) विश्वात यंदा मात्र त्यांचे कसब पाहता येणार नाही. कोरोना व ओमिक्रॉनचे(Omicron) कारण देत त्यांना प्रवेश नाकारल्याने काही स्थानिक संघांत अस्वस्थता आहे. ‘केएसए’ साखळी फुटबॉल स्पर्धा (Football Tournament) घेण्यास आधीच उशीर झाल्याची भावना फुटबॉलप्रेमींत आहे. संघांच्या नोंदणीस सुरुवात झाल्यानंतर वरिष्ठ गटातील पाच संघांनी नोंदणीस प्रतिसाद दिला.

हेही वाचा: ‘ऑरिक’मध्ये ‘स्टार्टअप’ला मिळाव्यात सुविधा‘

नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन केल्याने त्याची माहिती सर्व संघांना दिली असून खेळाडू व संघाच्या नोंदणीस मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी परदेशी खेळाडूंचा स्थानिक संघातील पत्ता कट केला आहे. दरवर्षी वरिष्ठ गटातील संघ परदेशी खेळाडूंना स्थान देतात. त्यांचा खेळ फुटबॉलप्रेमींना पाहता यावा व त्यांच्यातील कौशल्य स्थानिक खेळाडूंना शिकता यावे, असा दुहेरी उद्देश त्यामागे आहे.

दोन वर्षे लॉकडाउनमुळे साखळी स्पर्धा होऊ शकली नाही. आर्थिक कोंडी झाल्याने संघांत चिंतेचे सावट आहे. परदेशी खेळाडूंना ते मागतील ती किंमत देणे संघांना परवडणारे नाही, अशी बाजू मांडणारा एक गट तयार झाला आहे. काही संघ मात्र परदेशी खेळाडूंना घेण्याच्या तयारीत आहेत. ज्या संघांना परदेशी खेळाडूंना घेणे शक्य आहे, त्यांना तशी परवानगी द्यायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजन

'दोन वर्षे कोरोना काळात स्पर्धा झाल्या नसल्याने संघांचा आर्थिक डोलारा कोलमडला आहे. त्यामुळे संघांच्या मागणीनुसार यंदा परदेशी खेळाडूंना प्रवेश नाकारला. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, अशी भूमिका संघांनी घेतली आहे. परिणामी, ‘केएसए’चे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.'

- प्रा. अमर सासने, फुटबॉल सचिव, ‘केएसए’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
loading image
go to top