कोल्हापुरात पुन्हा एकदा गव्यांची दहशत; गोलीवडे गावात ठाण मांडले

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियीवर व्हायरल होत आहेत.
bison
bisonkolhapur
Updated on: 

कोल्हापूर: जिल्ह्यात पुन्हा एकदा गव्यांनी (Bison) दहशत माजवली आहे. आज सकाळी पन्हाळ्याच्या (Panhala) पायथ्याशी असलेल्या गोलीवडे (Goliwade) गावात गव्यांचा कळप नागरीकांना दिसला आहे. या भागात वारंवार गवे येत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी गव्यांचा एक कळप गोलीवडे गावात घुसला. हा कळप गावात घुसताच त्यांनी शेतीचे

या कळपाला पाहताच त्यांना हकलवण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली. या गव्यांनी शेतीचे नुकसान केले आहे. गव्यांच्या दहशतीमुळे नागरीक त्रस्त आहेत. गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियीवर व्हायरल होत आहेत.

bison
अविश्वास प्रस्तावापूर्वी पाकिस्तानात 24 खासदारांनी घेतला मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांपासून गव्यांचा कळप कोल्हापूर जिल्ह्यात धूमाकूळ घालत आहे. काही दिवसापूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरूणाला हाकनाक जीव गमवावा लागला आहे. काही जणांना गव्यांनी जखमी केले होते. काही वर्षापूर्वी एका माध्यम प्रतिनीधीचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सतत येणाऱ्या गव्यांच्या कळपांमुळे नागरीकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गव्यांचा वाढता मानवीवस्तीत हस्तक्षेप चिंतेचा विषय बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com