

Organ donation after fatal accident Kolhapur
esakal
Kolhapur Road Accident News: अल्पवयीन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील संदीप शिवाजी पोवार (वय ३७, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ) याचा मृत्यू झाला. साकोली कॉर्नर येथे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एकेरी मार्गावरून चुकीच्या दिशेने आलेल्या मोटारीने धडक दिली होती. याप्रकरणी अल्पवयीन चालकासह वडील श्रीकांत वसंतराव जाधव (४८, शिवाजी पेठ) यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.