Heart Attack : अवघ्या 23 वर्षाच्या पहिलवानाचा कोल्हापुरात हार्ट अटॅकने मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Suravse

Heart Attack : अवघ्या 23 वर्षाच्या पहिलवानाचा कोल्हापुरात हार्ट अटॅकने मृत्यू

कोल्हापूर : आजकाल तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढले असून अनेक तरूणांना हृदयविकाराने आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापुरमध्ये कुस्तीचा सराव करताना एका पहिलवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मारूती सुरवसे असं या मृत झालेल्या पहिलवानाचं नाव असून तो अवघ्या २३ वर्षाचा होता. त्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

(Kolhapur Pailwan Heart Attack Death)

मारूती सुरवसे हा पंढरपूर जवळील वाखरी येथील रहिवासी होता. अनेक वर्षापासून तो कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. सोमवारी सायंकाळी सरावानंतर तो रूमला आला आणि अंघोळ केल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Mumbai Airport Gold Seized : तस्करांची शक्कल, ३७ तोळे सोन्यासाठी वापरलेली युक्ती कस्टमसमोर Fail ठरली

दरम्यान, मारूती सुरवसे याचे वडील शेतकरी होते. त्याच्या मृत्यूने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर कोरोनानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून अनेक तरूण हृदयविकाराने मृत्यूमुखी पडले आहेत.

टॅग्स :Kolhapurdeathheart attack