

Leaders and supporters celebrate after Panchayat Samiti election results
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांपैकी करवीरसह चंदगड, पन्हाळा, शिरोळमध्ये मतदारांनी सत्तांतर घडविताना नव्या पक्षाला संधी दिली. शाहूवाडीत जनसुराज्य आणि राष्ट्रवादी-सेना आघाडीला समान जागा मिळाल्याने पेच निर्माण झाला आहे, तर राधानगरीत पूर्वी राष्ट्रवादीसोबत आघाडीत असलेल्या काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता मिळविली आहे.