

Kolhapur former sarpanch missing case
esakal
Former Sarpanch Missing In Patgaon Kolhapur : पाटगाव (ता. भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर (वय ५२) यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ वाढतच आहे. गेले सहा दिवस भुदरगड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पाटगावपासून सुमारे दोन किलोमीटरवर असणाऱ्या कुलकर्णी यांच्या शेताजवळ पिळणकर यांची दुचाकी पोलिसांना मिळून आली. तेथून दोनशे मीटरवर जंगलात एका ठिकाणी जळालेल्या अवस्थेत काही हाडे मिळाल्याने पोलिस चक्रावून गेले आहेत.