leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
esakal
फुलेवाडी (कोल्हापूर) : शहरातील फुलेवाडी- लक्षतीर्थ मार्गावर काल रात्री नऊच्या सुमारास एका तरुणास उसाच्या शेतात झेप घेणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या दिसल्याचे समजताच टेंबलाई मंदिर परिसरात तरुणांची मोठी गर्दी झाली. वनविभागाचे कर्मचारी उसाच्या शेतात बिबट्याच्या हालचाली दिसतात काय, ते ड्रोनद्वारे रात्री उशिरापर्यंत पाहत होते. घटनास्थळी वन विभाग व पोलिसांचा मोठा फौजफाटा तसेच अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले होते.