Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Kolhapur decoration godown fire today : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉन परिसरात डेकोरेशन साहित्याच्या गोडाऊनला आग लागली. अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल झाले असून आगीचे कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
Kolhapur decoration godown fire today

Kolhapur decoration godown fire today

esakal

Updated on: 

-राहुल गडकर

कोल्हापूर : ऐन दिवाळीच्या सणात कोल्हापुरात आगीची घटना घडली आहे. फुलेवाडी रिंग रोडवरील गंगाई लॉन परिसरातील डेकोरेशन साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली (Phulewadi Ring Road fire news) आहे. नरसिंह कॉलनी परिसरात असलेल्या या गोडाऊनमधून आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...