Bribery Case Police : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ७ लाखांची लाच, खाकीला बदनाम करणाऱ्या शेख, कांबळेचा रुबाब उतरला

Kolhapur Bribery Case : कोल्हापुरात पोलिसांच्या भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी शेख व कांबळे यांनी तब्बल ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Kolhapur crime news police bribery

Kolhapur crime news police bribery

esakal

Updated on

Kolhapur Police Bribery Case : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून सात लाखांची लाच मागणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवर आज गुन्हा दाखल झाला. एजाज महंमद शेख (पोलिस शिपाई, ब.नं. १५४१, रा. करनूर ता. कागल) आणि नीतेश मारुती कांबळे (पोलिस हेड कॉन्स्टेबल, ब.नं. १७४८, रा. दऱ्याचे वडगाव ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com