
कोल्हापूर : पिळदार शरीर बनविण्यासाठी बेकायदेशीरपणे वापरण्यात येणाऱ्या घातक ‘मेफेनटरेमाईन सल्फेट’ या इंजेक्शनचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. याप्रकरणी अमोल अशोक पाटील (वय ३४, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर) याला अटक करण्यात आली असून, त्याकडून ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शरीराला अपायकारक इंजेक्शनच्या विक्रीला बंदी असल्याने संशयिताने ती ऑनलाईनद्वारे मागविल्याची माहिती तपासात समोर येत आहे.