घरमालकाने काढले घरातून बाहेर अन् पोलिस आले मदतीला धावून 

kolhapur police help 17 works
kolhapur police help 17 works
Updated on

पट्टणकोडोली (कोल्हापूर) : घर मालकाने घरातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी  रात्रभर आणि त्रास सहन करीत तब्बल वीस किलोमीटरची पायपीट केली. मात्र ही घटना विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना समजली व  यांच्या कार्यतत्परतेमुळे तारदाळ (ता.हातकणंगले) येथील होम क्वाँरंटाईनचे शिक्के मारलेल्या मध्यप्रदेशातील त्या 17 कामगारांची अखेर फरपट थांबली.


पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील नवीन बसस्थानकापासून हुपरे नगर या भागातून अनोळखी काही लोक एकत्रपणे पायी चालत चालले पाहून अमर बाणदार या युवकाने त्यांना कोठूण आला असे विचारले. उत्तर संशयास्पद आल्याने त्याने गावतील कोरोना सनियंत्रण समितीला माहिती दिली. समितीतील रवी आडके, प्रकाश जाधव व अरुण माळी यांनी त्यांचा पाठलाग करुन फाईव्ह स्टार एमआयडीसी जवळ त्यांना पकडले. 

पकडलेले १७ कामगार हे मुळचे मध्य प्रदेशातील असून सध्या तारदाळ येथे वास्तव्यास होते. त्यांच्या हातावर होम क्वाँरंटाईनचे शिक्के मारलेले होते. मात्र तेथील घरमालकाने व काही नेते मंडळींनी त्यांना तेथून बाहेर काढून खोलीला कुलुपे लावली. ते तारदाळ, रुई, पट्टणकोडोली, फाईव्ह स्टार एमआयडीसी या मार्गे चालत गोकुळ शिरगाव येथे चालले होते, अशी माहिती मिळाली. 
आडके यांनी याबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात कळवले मात्र त्यांनी मनावर न घेतल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना त्यांनी कळवले. त्यानंतर तात्काळ गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याने गाडीची व्यवस्था करून या कामगारांना घेऊन स्वतः पोलिस तारदाळ येथे पोचले. त्या ठिकाणी शहापूर व हातकणंगले पोलिसही तत्काळ पोहोचले. तिन्ही ठिकाणच्या पोलिसांनी संबंधित घरमालकाविरुद्ध कारवाई करीत कामगारांच्या खोल्या त्यांना परत दिल्या व त्या ठिकाणी असलेल्या इतर कोणत्याही कामगारांना लाँकडाऊन संपेपर्यंत कोणीही हाकलू नये, अशा सूचना दिल्या. यामुळे या कामगारांची होणारी फरफट अखेर संपली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com