...तर 'त्या' लोकप्रतिनीधींवर होणार गुन्हे दाखल ; जिल्हाधिकाऱ्यांचा धाडसी निर्णय

case filed against people who recommended them say kolhapur collector
case filed against people who recommended them say kolhapur collector

कोल्हापूर : जिल्ह्याबाहेरील काही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्तिंसह संस्थांचे पत्र दाखवून शहरात प्रवेश करण्यासाठी किणी टोल नाक्‍यावर मोठी गर्दी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, असे पत्र दाखविणाऱ्यांकडून संबंधीत पत्र व त्यांची वाहने जप्त करावीत. तसेच, त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावेत, अशा सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या आहेत. 

एकीकडे संचारबंदी लागू करायची आणि दुसरीकडे लोकप्रतिनिधीच आपआपल्या लोकांना पत्र देवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असचे चित्र किणी टोल नाक्‍यावर दिसत आहे. प्रत्येकजण आपआपल्या लोकप्रतिनिधींचे पत्र दाखवून कोल्हापूर शहरात घूसण्याचा प्रयत्न करत आहे. मंगळवारपेठेतील आणि इस्लामपूरमधून पेठ वडगावमध्ये आलेल्या अशाच लोकांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे कोल्हापूर वासियांकडून कौतुक होत आहे. 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाय केले जात आहेत. सर्व नाके बंद केले आहेत. तरीही, पुणे, मुंबईसह इतर ठिकाणाहून कोल्हापूरात अनेक लोक येत आहेत. अचानक आलेल्या लोकांकडून जिल्ह्यात कोरोना संर्सग वाढण्याचा धोका आहे. अशा लोकांकडून लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठीतव्यक्तिंसह खासगी संस्थेचे पत्र दाखवले जात आहे. त्यामुळे ज्यांनी-ज्यांनी असे पत्रे दिली आहेत, ती परत मागवून घ्यावीत. किणी टोल नाक्‍यावर असे पत्र दाखवल्यास संबधींतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय योग्यच  
जिल्हा प्रशासन, शासकीय आरोग्य विभाग, महानगरपिालका, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी योग्य नियोजन केले जात आहे. दोन रुग्ण सापडल्यामुळे जिल्हा प्रशासनावर निश्‍चितपणे ताण आला असेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आता स्वत:हून याचे भान ठेवले पाहिजे. जिल्ह्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी आहे. त्यामुळे आताच काळजी घेतील पाहिजे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतलेला हा निर्णय निश्‍चितपणे चांगला आहे. 
विशाल शिंदे, कोल्हापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com