

Kolhapur Market Yard gambling
sakal
कोल्हापूर: मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधी वसाहतीतील जुगार अड्ड्यावर छापा टाकून चौदा जणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत रोख रकमेसह दोन लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.