
गरीब असल्याचा गैरफायदा घेत महिलांना वेश्या व्यवसाय चालवायचा...
esakal
तीन ठळक मुद्दे (Highlight Summary Points):
व्हिनस कॉर्नर परिसरात पोलिसांचा छापा:
महिलांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकून मालक जयसिंग मधुकर खोत (वय २६) याला ताब्यात घेतले.
दोन महिलांची सुटका:
पोलिसांनी या कारवाईत उत्तर प्रदेश आणि रायगड जिल्ह्यातील दोन पीडित महिलांची सुटका केली असून, ९,२५० रुपये रोख आणि मोबाईलसह साहित्य जप्त केले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई:
पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या आदेशाने, निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली.
Kolhapur crime news : महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या व्हिनस कॉर्नर परिसरातील एका लॉजच्या चालक-मालकाला पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. जयसिंग मधुकर खोत (वय २६, रा. कुंभारवाडी, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील एक व रायगड जिल्ह्यातील एक अशा दोन पीडितांची सुटका केली. छाप्यात ९ हजार २५० रोख, मोबाईल हँडसेटसह अन्य साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.