Police Recruitment : पोलिस भरतीसाठी उद्यापासून मैदानी चाचणी सुरू; भरतीपूर्वी ओळखा स्वतःची क्षमता

Physical Test : कोल्हापूर पोलिस दलातील ८८ रिक्त शिपाई पदांसाठीची बहुप्रतीक्षित भरती प्रक्रिया अखेर शुक्रवारपासून सुरू होत आहे. जवळपास सहा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने कवायत मैदानावर उत्साह, तणाव आणि स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Candidates prepare for the Kolhapur Police recruitment

Candidates prepare for the Kolhapur Police recruitment

sakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील रिक्त ८८ पोलिस शिपाई पदांसाठीची भरती प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. १३) सुरू होत आहे. शुगर मिल कॉर्नर ते शिये व पोलिस कवायत मैदान येथे धावणे, गोळाफेक या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. जवळपास सहाहजार जणांनी अर्ज दाखल केले असून, दररोज ७०० ते एक हजार उमेदवारांना बोलविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com