Police Department
esakal
अकलूज टोळीवरील मोक्का कारवाई रद्द करण्यासाठी ६५ लाखांची मागणी
सहायक फौजदार मिलिंद नलावडे यांना निलंबित करण्याचा एसपींचा आदेश
दोन आरोपी अटकेत, मुख्य आरोपी फरारी; तपास सुरू
कोल्हापूर : अकलूज (जि. सोलापूर) येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरील मोक्का कारवाई रद्द करून देण्याचे (Kolhapur Police Suspension) आमिष दाखवत तब्बल ६५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे यांना निलंबित करण्यात आले आहे.